माहिती व जनसंपर्क महासंचालनालय


कार्यालयाची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिध्दीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख सर्वांना आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा आहे. शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते. महाराष्ट्र शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती या यंत्रणेद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येते. दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे, माहितीपूर्ण रंगीत प्रसिध्दी साहित्याची निर्मिती करुन अशा प्रसिध्दी साहित्याचे वाटप करणे, विविध विषयांवर वृत्तचित्र (अनुबोधपट) निर्माण करणे, असे वृत्तचित्र (अनुबोधपट) नागरी तसेच ग्रामीण भागातून जनतेस नित्यनेमाने दाखविणे, राज्य विभागीय व जिल्हा स्तरांवर प्रदर्शने आयोजित करणे तसेच राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये भाग घेणे, विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत शासनासंबंधीची माहिती पुरविणे, शासकीय जाहिरातीचे विविध वृत्तपत्रांना वाटप करणे हया गोष्टींचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यात समावेश होतो. जनतेची मते व प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राज्यात प्रसिध्द होणाऱया सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांची व अन्य प्रकाशनांची रोजच्या रोज हया विभागामार्फत छाननी केली जाते आणि त्याद्वारे प्रगट झालेली जनतेची शासकीय ध्येयधारणे व कार्यक्रम हयासंबंधीची सर्वसाधारण प्रतिक्रिया व तिचे एकूण स्वरुप हयासंबंधीची माहिती शासनाला सतत पुरविण्यात येते. तसेच नित्यांच्या कामापेक्षा वेळोवेळी अनेकविध उपक्रम शासनाच्या विविध खात्यांच्या सुचनेनुसार या महासंचालनालयाला हाती घ्यावे लागतात.

रचना :

महासंचालक या पदावरील सनदी अधिकारी या यंत्रणेचा प्रमुख असतो. महासंचालकांच्या अखत्यारीत संचालक (माहिती), संचालक (प्रशासन)/ मुंबई येथे व औरंगाबाद, नागपूर येथेही संचालकांची पदे आहेत. विभागीय स्तरावर सात उपसंचालकांची पदे आहेत. (कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नवी दिल्ली) आणि जिल्हा माहिती कार्यालये (35) कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्रातील योजनांची माहिती महाराष्ट्राबाहेरील जनतेला देण्यासाठी दिल्ली आणि गोवा येथेही महाराष्ट्र परिचय केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

arrows

महासंचालक
arrows
arrows arrows arrows arrows
संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क), मुंबई) संचालक (प्रशासन व तांत्रिक कक्ष), मुंबई संचालक (माहिती) नागपूर-अमरावती विभाग, नागपूर संचालक (माहिती) मराठवाडा विभाग, औरंगाबाद
 
सहा विभागीय माहिती उपसंचालकांची कार्यालये
arrows arrows arrows arrows arrows arrows
पुणे नाशिक कोकण भवन कोल्हापूर अमरावती लातूर
 

मुख्यालयातील उपसंचालक

arrows arrows arrows arrows arrows
उपसंचालक (माहिती/प्रशासन) उपसंचालक (वृत्त) उपसंचालक (प्रकाशने)   उपसंचालक (लेखा)     उपसंचालक (प्रदर्शने)
 
उपसंचालक (माहिती) महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
arrows
वरिष्ठ सहायक संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा
arrows

जिल्हा माहिती कार्यालये (31), माहिती केंद्रे (4)

arrows

उप माहिती कार्यालये (16)

arrows
आदिवासी प्रकर्षित पथके (19), चित्ररथ योजना (2)