अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने


अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय आता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई यांचा एक अविभाज्य भाग आहे. मुद्रणालय व पुस्तक नोंदणी अधिनियम 1867 व त्याखालील केलेले नियम यांची अंमलबजावणी हे या कार्यालयाचे मुख्य काम होय. या कार्यालयात आलेल्या वृत्तपत्रांची, नियतकालिकांची नोंदणी करणे, त्यातील मजकुराची छाननी करणे व वृत्तपत्रांची वार्षिक सूची तयार करणे, तसेच पुस्तकाचे वर्गीकरण करुन तिमाही सूची छापून प्रसिध्द करणे आदी कामे अधिनियमाखाली पार पाडली जातात. तसेच देशमुख समितीच्या अहवालानुसार जाहिरात वितरणासाठी वृत्तपत्रांच्या खपाच्या पडताळणीचे कामही केले जाते.