आकाशवाणीच्या राज्यातील 22 केंद्रांवरून 'दिलखुलास' हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय, उपक्रम व योजना यांवर आधारित असलेला मुलाखत स्वरूपातील हा कार्यक्रम आकाशवाणीवरून सोमवार ते शनिवार असे एकूण सहा दिवस सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होतो. आकाशवाणीच्या पहिल्या सर्वाधिक लोकप्रिय पाच कार्यक्रमांत हा कार्यक्रम गणला जातो.