आपलं मंत्रालय या गृहपत्रिकेच्या सदर अंकात मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः भेट दिलेल्या ठिकाणांचे अनुभववर्णन, कविता, भरडधान्याचे आरोग्यदायी उपयोग, सुलेखन मालिका, कचरा व्य
लोकराज्य - सर्वत्र, सर्वोत्तम!
मराठी लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती असलेले नियतकालिक मार्च 1955 पासून प्रकाशित होत आहे. (सुरुवातीला काही काळ लोकराज्य (इंग्रजी) या नावाने आणि नंतर ‘महाराष्ट्र अहेड’ या नावाने) राज्याच्या वैभवशाली संस्कृतीची आणि विकासाची देशाला व जगाला ओळख व्हावी यासाठी इंग्रजी माध्यमातून हे मासिक प्रकाशित केले जाते. राज्याला भेटी देणारी शिष्टमंडळे, राज्यसभा, लोकसभा सदस्य, विविध राज्यांच्या प्रमुख व्यक्तींपर्यंत हे मासिक पोहोचते आणि राज्याची प्रतिमा उंचावते.
राज्यात उर्दू भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचवण्याचे काम उर्दू भाषेतील लोकराज्य जानेवारी 1974 पासून यशस्वीपणे करत आहे. अल्पसंख्याकांच्या दृष्टीने उपयुक्त योजना व निर्णयांची माहिती यामध्ये प्रामुख्याने दिली जाते.
राज्यात हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती राज्यातील हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने 1976 पासून हिंदी भाषेतून लोकराज्य प्रसिध्द केले जात आहे.
राज्यात मुंबई व इतर काही ठिकाणी गुजराती भाषिकांची मोठी संख्या पाहता गुजराती भाषेतूनही लोकराज्य प्रकाशित करण्यात येत आहे. गुजराती भाषिकांनाही राज्यातील घडामोडी, निर्णय, योजना यांची माहिती व्हावी, येथील संस्कृती व परंपरा याची ओळख व्हावी या दृष्टीने हे नियतकालीक 1976 पासून प्रसिध्द केले जात आहे.
ह्या सर्व आवृत्त्या खाली आपल्या भाषेच्या पसंतीनुसार फिल्टर करून पाहता व डाऊनलोड करता येतील..
लोकराज्य सप्टेंबर२०२५
महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्ती काही नवीन नाही. राज्याला भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, अतिवृष्टी अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.
आपलं मंत्रालय ऑगस्ट २०२५
या विशेषांकामध्ये शिवकालीन गडकिल्ले, शस्त्रे, पत्रव्यवहार, चलन, जलव्यवस्थापन अशा विविध विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे.
छत्रपतींच्या दुर्गवैभवाला वैश्विक मानवंदना ! जागतिक वारसा नामांकन यादीत १२ किल्ले समाविष्ट
राज्याच्या सामाजिक, तांत्रिक तसेच प्रशासनिक नवोपक्रमांमुळे देशालाही नवी दिशा मिळत आहे. या साऱ्या उपलब्धींसोबतच महाराष्ट्राच्या वारशाचा गौरवही वेळोवेळी होत असतो.
आपलं मंत्रालय जुलै 2025
"भारतातील प्राचीन रंगांचा इतिहास", "शालेय शिक्षण विभाग व माननीय न्यायालय यांचा परस्पर संबंध" यांसारखे सखोल व ज्ञानवर्धक लेख समाविष्ट आहेत.






