माहितीच्या अधिकारअंतर्गत विवरणपत्रे
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये नमूद केल्यानुसार विविध 17 प्रकारची माहिती प्रत्येक कार्यालयाने स्वंयप्रेरणेने प्रकाशित करावयाची आहे. जसे, कार्यालयाचे नाव, उद्दिष्ट, कामे, तेथील कर्मचाऱ्यांची पदे व कामे, निर्णय प्रक्रिया, पर्यवेक्षणाची पद्धत, योजनांचा तपशिल इ. संदर्भातील माहिती कॉम्प्युटर नेटवर्कद्वारे अथवा इतर सुविधेच्या द्वारे जनतेला उपलब्ध करून द्यावयाची आहे.
त्यानुसार शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी तयार करण्यात आलेले माहितीच्या अधिकारअंतर्गत 17 विवरणपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- 7558 views