शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय, उपक्रम व योजना यांवर आधारित मुलाखत स्वरूपातील 'जय महाराष्ट्र' कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर मंगळवारी व शुक्रवारी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या 'प्राईम टाईम'मध्ये प्रसारित होतो. दूरदर्शनच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमात हा कार्यक्रम गणला जातो.