माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेचे प्रकाशन करण्यात येतं. मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यक्त होण्यासाठी आपलं मंत्रालय हे हक्काचे व्यासपीठ आहे. आपलं मंत्रालय' हे फेब्रुवारी २०२५ पासून नव्या रूपात सुरू झाले आहे. प्रशासनातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे केवळ निपुण प्रशासक नाहीत, तर उत्तम कवी, लेखक, संगीतप्रेमी, नाट्यकलावंत आणि विचारवंतही आहेत. अशा सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी हे मासिक निश्चितच एक महत्त्वाचे 'व्यासपीठ' ठरेल. 'आपलं मंत्रालय' हे अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वतःला नव्याने ओळखण्याची, आपल्या सुप्त गुणांना अभिव्यक्त करण्याची आणि प्रशासकीय व्यवस्थेतील कार्यसंस्कृती अधिक समृद्ध करण्याची संधी आहे. मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुप्तगुणांना वाव देणारे हे नियतकालिक या ठिकाणी तुम्हाला वाचता येईल.

आपलं मंत्रालय |

आपलं मंत्रालय

आपलं मंत्रालय‘ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या कथा, कविता, स्वानुभव तसेच पाककला, भ्रमंती या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.