मुद्रणालये व पुस्तक नोंदणी अधिनियम 1867 अन्वये, प्राप्त पुस्तकांची तिमाही ग्रंथसूची. अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने, या कार्यालयाकडून मुद्रणालये व पुस्तक नोंदणी अधिनियम 1867 या कायद्यातील नियम 9 (अ) अनुसार महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणा-या सर्व भाषेतील सर्व प्रकारच्या पुस्तकांच्या 2 प्रती, मुद्रकांनी/प्रकाशकांनी प्रकाशन दिनांकापासून 1 महिन्याच्या आत अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने कार्यालय, मुंबई या कार्यालयात स्वखर्चाने विनामूल्य पोहोचवणे आवश्यक आहे. मुद्रकाने पुस्तक जमा करत असताना त्यात पुस्तकाचे नाव, भाषा, लेखक/अनुवादक/संपादकाचे नाव, विषय, मुद्रणसंस्थेचे नाव, प्रकाशन संस्थेचे नाव, प्रकाशन दिनांक, पृष्ठसंख्या, आकार, आवृत्ती क्रमांक, प्रती, छपाईचा प्रकार, किंमत, मुद्रण हक्क ज्याच्याकडे असतील त्यांचे नाव व पत्ता ही सर्व माहिती असणे आवश्यक आहे. प्राप्त पुस्तकांचे परीक्षण, वर्गीकरण करून त्याची कार्यालयीन अभिलेख्यात नोंद घेतली जाते व त्यानुसार पुस्तकांची तालिकीकृत नोंद असलेली ग्रंथसूची तयार केली जाते. सन 2021 पासून ही तिमाही ग्रंथसूची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते.
तिमाही ग्रंथसूची |

दुसरी तिमाही-2022

तिमाही ग्रंथसूची |

तिसरी तिमाही-2022

तिमाही ग्रंथसूची |

पहिली तिमाही - 2022

तिमाही ग्रंथसूची |

चौथी तिमाही-2021

तिमाही ग्रंथसूची |

तिसरी तिमाही -2021

तिमाही ग्रंथसूची |

दुसरी तिमाही -2021