श्री. शशिकांत दैठणकर

रूजू

कार्यमुक्त

१९६२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या शशिकांत दैठणकर यांनी कोल्हापूर, भंडारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे सचिव म्हणून काम केलेल्या दैठणकर यांनी राज्याचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालक, वित्त विभागाचे सचिव तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही काम केले होते. शिक्षण व वित्त आणि ग्रामविकास विभागामधून त्यांनी निवृत्ती घेतली. श्री. शशिकांत दैठणकर यांचे 74 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.