माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले 'लोकराज्य' मासिक महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे. मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिध्द होणाऱ्या या मासिकाला तब्बल सात दशकांची यशस्वी परंपरा लाभली आहे. मार्च १९४७ पासून प्रसिध्द होणारे हे नियतकालीक राज्याचा जडणघडीचा बोलका साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रीमंडळ निर्णय, विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणजे लोकराज्य. विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती यामुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळेच लोकराज्य हे मराठी मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून ऑडिट ब्युरो ऑफ सक्युर्लेशन (अेबीसी)ने अधिकृत मोहोर उमटवली आहे.

मराठी लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती असलेले नियतकालिक मार्च 1955 पासून प्रकाशित होत आहे. (सुरुवातीला काही काळ लोकराज्य (इंग्रजी) या नावाने आणि नंतर ‘महाराष्ट्र अहेड’ या नावाने) राज्याच्या वैभवशाली संस्कृतीची आणि विकासाची देशाला व जगाला ओळख व्हावी यासाठी इंग्रजी माध्यमातून हे मासिक प्रकाशित केले जाते. राज्याला भेटी देणारी शिष्टमंडळे, राज्यसभा, लोकसभा सदस्य, विविध राज्यांच्या प्रमुख व्यक्तींपर्यंत हे मासिक पोहोचते आणि राज्याची प्रतिमा उंचावते.

राज्यात उर्दू भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचवण्याचे काम उर्दू भाषेतील लोकराज्य जानेवारी 1974 पासून यशस्वीपणे करत आहे. अल्पसंख्याकांच्या दृष्टीने उपयुक्त योजना व निर्णयांची माहिती यामध्ये प्रामुख्याने दिली जाते.

राज्यात हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती राज्यातील हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने 1976 पासून हिंदी भाषेतून लोकराज्य प्रसिध्द केले जात आहे.

राज्यात मुंबई व इतर काही ठिकाणी गुजराती भाषिकांची मोठी संख्या पाहता गुजराती भाषेतूनही लोकराज्य प्रकाशित करण्यात येत आहे. गुजराती भाषिकांनाही राज्यातील घडामोडी, निर्णय, योजना यांची माहिती व्हावी, येथील संस्कृती व परंपरा याची ओळख व्हावी या दृष्टीने हे नियतकालीक 1976 पासून प्रसिध्द केले जात आहे.
ह्या सर्व आवृत्त्या खाली आपल्या भाषेच्या पसंतीनुसार फिल्टर करून पाहता व डाऊनलोड करता येतील..

दिलखुलास |

'दिलखुलास'कार्यक्रमात राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांची मुलाखत (भाग २)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात 'पर्यटन व उद्योग क्षेत्रात महिलांना संधी' या विषयावर उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधि व

दिलखुलास |

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांची मुलाखत (भाग २)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’कार्यक्रमात मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांची 'निर्धार करू पाणी जपून वापरण्याचा' या विषयावर विशेष मुलाखत

दिलखुलास |

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांची मुलाखत (भाग 1)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’कार्यक्रमात मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांची 'निर्धार करू पाणी जपून वापरण्याचा' या विषयावर विशेष मुलाखत

दिलखुलास |

‘स्वच्छ शहर व आनंदी शहर’(भाग १)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘स्वच्छ शहर व आनंदी शहर’ या विषयावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांची विशेष मुलाखत

दिलखुलास |

‘स्वच्छ शहर व आनंदी शहर’ (भाग २)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘स्वच्छ शहर व आनंदी शहर’ या विषयावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांची विशेष मुलाखत

दिलखुलास |

'पर्यटनातून रोजगार वृद्धी' (भाग २)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'पर्यटनातून रोजगार वृद्धी’ या विषयावर पर्यटन, संचालक डॉ. धनंजय सावळकर यांची विशेष मुलाखत