घर तुमचे आमचे घर हक्काचे……

‘सर्वांसाठी घरे’ या विषयाला वाहिलेल्या या अंकात राज्य शासन राबवित असलेल्या गृहनिर्माण प्रकल्प आणि योजनांची माहिती देण्यात आली आहे. राज्यात महाआवास योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. म्हाडा आणि सिडको करीत असलेल्या कार्याबद्दल माहिती अंकात देण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात वंचित आणि उपेक्षीत घटकांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे अनेक कुटुंबांना हक्काचे घरकूल मिळाले आहे. याबाबतच्या यशकथांचा समावेश हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे