महापर्यटन संधी-सुविधा, ‘प्रबोधन’ शताब्दी वर्ष विशेष
राज्य शासन पर्यटन विकासासाठी अनेक धोरणे राबवित असून त्यातून रोजगार वाढीसाठीही खूप मोठी मदत मिळणार आहे. स्थानिकांना त्याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी कशा पद्धतीने पुढे येत आहे, याबाबत या अंकात विशेष लेखांचे समायोजन केले आहे. त्यासोबतच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या क्रांतिकारक विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यातून सामाजिक घुसळण निर्माण करण्यासाठी ‘प्रबोधन’हे नियतकालिक चालवले. ‘प्रबोधन’चे हे शताब्दी वर्ष असून यानिमित्त एक स्वतंत्र विभाग या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे.
याशिवाय मंत्रिमंडळात ठरले, महत्त्वाच्या घडामोडी ही सदरे आणि कोविडसंदर्भात राज्य शासन राबवत असलेल्या उपाययोजनांचा समावेश या अंकात केला आहे.
- 3019 views