‘लोकराज्य’ मार्च-एप्रिल 2022

 

लोकराज्यचा मार्च-एप्रिल महिन्याचा अंक महिला विशेषांक असून अर्थसंकल्प 2022-23 ची ओळख व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष विभागही या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे.

राज्य शासन महिलांसाठी राबवत असलेल्या योजना, यशस्वी महिलांच्या यशकथा हे या अंकाचे आकर्षण आहे. त्याचबरोबर पंचसूत्रीवर आधारीत असलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण तरतूदींची माहितीही अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. 14 एप्रिल ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त अंकात विशेष विभाग समाविष्ट करण्यात आला असून भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे