लोकराज्य मे २०२२
'लोकराज्य' मे-2022 महिन्याच्या अंकात पर्यटन विशेष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त कृतज्ञता पर्व विशेष विभाग समाविष्ट आहे.
राज्यात पर्यटनाच्या असंख्य संधी आहेत. कृषी पर्यटन, वन पर्यटन, जलपर्यटन तसेच लेणी, जागतिक वारसास्थळे, धार्मिकस्थळे, गडकिल्ले, जैवविविधता अशा असंख्य पर्यटनाच्या पर्यायांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती देणारे लेख या अंकात समाविष्ट आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे केले जात आहे. या अंकात समाविष्ट करण्यात आलेल्या ‘कृतज्ञता पर्व विशेष’ विभागात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची, योगदानाची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ‘कांदळवन संरक्षण व संवर्धन’, ‘समता सप्ताह’, ‘जागतिक परिचारिका दिन’ आदी विषयांचे लेख यात आहेत. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, वाचू आनंदे सदरांचाही समावेश आहे.
- 2508 views