स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाच्या ऑगस्ट-2022 या महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या अंकात महाराष्ट्राने केलेल्या आजवरच्या वाटचालीचा समग्र आढावा घेण्यात आला आहे.
स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय आहे. या सर्वांचा “स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्र” आणि “स्वातंत्र्यलढा आणि महिला” या लेखातून आढावा घेण्यात आला आहे. नुकताच स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणाचा संपादित भाग समावेश करण्यात आला आहे. तसेच 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “घरोघरी तिरंगा” हे अभियान राबविण्यात आले, या अभियानाविषयी माहिती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्रिमहोदयांचा संक्षिप्त परिचय या अंकात देण्यात आला आहे. ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ हा लेख अंकात घेण्यात आला आहे.
- 1901 views