शाश्वत शेती समृद्ध शेतकरी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या एप्रिल-मे 2023 च्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कृषी विशेषांकामध्ये कृषी, फलोत्पादन, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सहकार व पणन, मृद व जलसंधारण आदी विभागाच्यावतीने राज्यात राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुखकर बनवलेल्या लाभार्थ्यांच्या यशकथांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. याच बरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विशेष लेख तसेच महत्त्वाच्या घडामोडी, मंत्रिमंडळात ठरले या सदरांचाही समावेश करण्यात आला आहे.
- 5034 views