संकल्प पूर्ती महाराष्ट्राची नवनिर्मिती सुराज्याची !
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या जानेवारी 2024 चा संकल्प पूर्ती महाराष्ट्राची नवनिर्मिती सुराज्याची ! या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
नवी मुंबई-मुंबईला जोडणारा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू (अटल सेतू) चे लोकार्पण आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाच्या परिसरात 365 एकर जागेवर “ रे नगर गृहनिर्माण प्रकल्प” राबविला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. नाशिक येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले याचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ भोसले, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेखांसह मंत्रिमंडळातील निर्णय यांचाही समावेश या अंकात करण्यात आला आहे.
- 2533 views