उत्सव अभिजात मराठीचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली

लोकराज्य’ मासिकाच्या या विशेषांकामध्ये मराठी भाषा आणि साहित्याचा विविधांगांनी वेध घेणारे अनेक नामवंत साहित्यिक आणि अभ्यासकांचे लेख या अंकात समाविष्ट आहेत. संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत विविध टप्पे आणि प्रवाहांचा वेध घेण्यात आला आहे. आधुनिक कवितेचे जनक केशवसुतांपासून बालकवी, मर्ढेकर, नारायण सुर्वे अशी कवितेची सशक्त परंपरा मराठीत निर्माण झाली. नेमाडे, चित्रे, कोल्हटकर, नामदेव ढसाळ यांनी भारतीय पातळीवर आपल्या कवितेची मुद्रा उमटवली. 1990 नंतर कवींची एक नवी पिढी पुढे आली. मराठी कवितेच्या परंपरेचा ऊहापोह या अंकात केला आहे. 

‘व्याख्यानव्रती : लक्ष्मणशास्त्री जोशी’, ‘साहित्य संमेलनाच्या देशा’, ‘माझी पहिली ववी गं....’, ‘प्राचीन मराठी भाषेचे वैभव’ आणि ‘मराठी साहित्य संमेलन सांस्कृतिक महोत्सव’ अशा विविध विषयांवरील लेखांनी सजलेला ‘लोकराज्य’चा हा विशेषांक वाचकांना निश्चित आवडेल.