सृजनातून समृद्धीकडे!
‘लोकराज्य’ मासिकात वेव्हज् परिषदेच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या लेखात माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील क्रांती, संचालक किशोर गांगुर्डे यांचा नव्या युगातील वेव्हज बाजार, भारताची नवी ओळख कंटेंट सुपरपॉवर, अभिनेता आमिर खान यांचा माध्यम–मनोरंजन क्षेत्राचा अनोखा 'लगान' क्षण, मनोरंजन क्षेत्राची उज्वल भवितव्याकडे आगेकूच– अनिल कपूर, कम्युनिटी रेडिओतून जनप्रबोधनाच्या लहरी, भारतीय चित्रपट सृष्टीची एक दृश्यात्मक वाटचाल, स्मरण रंजन घडविणारी चित्रपटांची पोस्टर्स अशा विविध माध्यम – मनोरंजन क्षेत्राची तंत्रज्ञानावर आधारित सुरू असलेल्या यशस्वी वाटचालीची सर्वसमावेशक माहितीचा संग्रह 'लोकराज्य ' मासिक व 'महाराष्ट्र अहेड' या विशेष अंकात करण्यात आला आहे.
यासोबतच ' लोकराज्य ' या मासिकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सिंहस्थ कुंभमेळा शबरी नॅचरल बाईक टॅक्सी अन्नसुरक्षा जलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा शासनाने राबविलेल्या विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.
- 35 views