छत्रपतींच्या दुर्गवैभवाला वैश्विक मानवंदना ! जागतिक वारसा नामांकन यादीत १२ किल्ले समाविष्ट
राज्याच्या सामाजिक, तांत्रिक तसेच प्रशासनिक नवोपक्रमांमुळे देशालाही नवी दिशा मिळत आहे. या साऱ्या उपलब्धींसोबतच महाराष्ट्राच्या वारशाचा गौरवही वेळोवेळी होत असतो. त्यातील एक सोनेरी पर्व म्हणजे दिनांक ११ जुलै २०२५ रोजी आपल्या सर्वांचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणाऱ्या शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी या १२ किल्ल्यांचा समावेश युनिस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाला. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर युनेस्कोच्या माध्यमातून झालेला सन्मान कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे शाश्वत संवर्धन व जतन करणे ही देखील आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शिवरायांची गौरवगाथा सांगणाऱ्या किल्ल्यांचा जागतिक पातळीवर सन्मान ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याने शासनाचे मुखपृष्ठ असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या या अंकात देखील या सुवर्ण क्षणांच्या अनुषंगाने अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राज्य शासन प्रत्येक क्षेत्रात आवश्यक त्या सुधारणा करून लोकाभिमुख योजनांची सर्वसामान्य जनतेसाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी भर देत आहे. यानुसारच लोकाभिमुख असलेला महसूल विभाग, राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पणन विभागाच्या माध्यमातून आधुनिक संसाधनयुक्त उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, तसेच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची किनार लाभत आहे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीची ई-गव्हर्नन्समध्ये राष्ट्रीय पातळीवर घेतलली भरारी यासारख्या लेखांसोबतच न्यायमूर्ती भूषण गवई या महाराष्ट्राच्या सुपुत्राची न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली, त्यामुळे राज्याच्या विधानमंडळाने केलेला त्यांचा सन्मान आणि मानवी मुल्यांना नवसंजीवनी देणाऱ्या श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानाची माहिती देणारा लेख अशा विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेखांचा समावेश ‘लोकराज्य’च्या या अंकात करण्यात आला आहे.
000000
- 25 views