लोकराज्य सप्टेंबर२०२५

महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्ती काही नवीन नाही. राज्याला भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, अतिवृष्टी अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. अशा सर्व आपत्तींवर आजपर्यंत यशस्वीपणे मात करण्यासाठी शासन सदैव तत्पर असते. अशाच अतिवृष्टीमुळे मागील आठवड्यात राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. राज्यावर अस्मानी संकट ओढावल्याने संवेदनशील राज्य शासनाने तत्काळ याची दखल घेऊन, या भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी मदतीचा हात देऊन पूरपरिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अतिवृष्टीने बाधित भागाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांनी नुकसानाची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. राज्य शासनामार्फत करण्यात आलेली मदतीची अधिकाधिक माहिती या लोकराज्य अंकात दिली आहे.

यासोबतच राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा, मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने संकल्प मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीचा, आरोग्यविषयक योजनांची माहिती, गणेशोत्सव ते राज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील नवीन नागपूर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय, देशात पहिले ठरलेले डिजिटल गाव सातनवरी, कोल्हापूर विभागात सर्किट बॅचचा झालेला शुभारंभ, बीड ते अहिल्यानगर रेल्वे : जिल्ह्याची विकासवाहिनी यांसह विविध विषयांची व विकासकामांबाबतची माहिती या अंकात देण्यात आली आहे.