‘पुनरीक्षण कार्यक्रम; नोंदणी करा, मतदार व्हा’
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या नोव्हेंबर महिन्याचा अंक ‘पुनरीक्षण कार्यक्रम; नोंदणी करा, मतदार व्हा’ यावर आधारीत आहे.
1 जानेवारी 2022 रोजी ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहे त्यांच्या नावाची नोंदणी 1 ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान केली जात असून त्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाविषयी व मतदार नोंदणीविषयी महत्त्वपूर्ण माहिती या अंकात देण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा पुन्हा सुरू, लसीकरण, ई-पीक पाहणी, कृषी यशकथा, सौरऊर्जेतून महावीजनिर्मिती, रक्तदान, मराठी रंगभूमी दिन, स्पर्धा परीक्षा आदींविषयीचे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
- 3924 views