पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत तयार करण्यात आलेल्या 'लोकराज्य' विशेषांक मध्ये लोककल्याणकारी धर्मपरायणता, लोकोत्तर कार्याचा आदर्श, एक तात्विक रूप, दातृत्वातून सांस्कृतिक एकता एक मार्गदर्शक दीपस्तंभ अशा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या विविध गुण कौशल्यांची माहिती देणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच सहा मे 2025 रोजी मंत्री परिषदेची विशेष बैठक चौंडी येथे घेण्यात आली होती त्या परिषदेत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची देखील माहिती या अंकात समाविष्ट करण्यात आली आहे.
जागतिक अन्नसुरक्षा दिन ७ जून रोजी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने देखील या अंकात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा व विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या वेव्हज् 2025 परिषदेच्या यशस्वीतेचा आढावा, महिला व बालविकास ची सुप्रशासनात आघाडी, उच्च व तंत्र क्षण विभागाचा अटल उपक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरण तसेच वाळू निर्गती धोरण याबाबतही माहितीपूर्ण लेखांचा लोकराज्याच्या या विशेष अंकात समावेश करण्यात आला आहे.
- 1551 views