एकच ध्येय - महाराष्ट्र धर्म

अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्क मैदानाच्या इतिहासात २८ नोव्हेंबरची संध्याकाळ एक विशेष संध्याकाळ म्हणून गौरवली जाइल. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रचंड गर्दीच्या सभांनी गजबजून जाणाऱ्या ह्या मैदानात जेव्हा श्री. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळ संपूर्ण मैदान रोमांचीत झाले.