बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी

संशोधनांच्या आधारे महाराष्ट्री (मराठी) भाषा ही किमान २५०० वर्षे जूनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. महाराष्ट्री (मराठी) भाषेचा हा २५०० वर्षांचा प्रवास साधार उलगडला म्हणजे ही अभिजात भाषा असल्याचे निर्विवादपणे सिद्ध होते.