लोकराज्य दिवाळी विशेषांक

 

वर्षानुवर्षे विविध विषयांवरील विशेषांकांद्वारे 'लोकराज्य'ने स्वतःची स्वतंत्र परंपरा निर्माण केली आहे. त्या परंपरेत यंदा प्रथमच 'लोकराज्य'चा दिवाळी विशेषांक प्रकाशित होत आहे. या विशेषांकात प्रकाशाचा, आनंदाचा आणि सृजनाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाचे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील आदिवासी, बंजारा समाज; तसेच कोकण, मराठवाडा, विदर्भ अशा विविध प्रांतांतील पारंपरिक दिवाळी साजरी करण्याच्या रूढी, प्रथा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची मेजवानी या अंकात मिळणार आहे.