माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले 'लोकराज्य' मासिक महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे. मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या या मासिकाला तब्बल सात दशकांची यशस्वी परंपरा लाभली आहे. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक राज्याचा जडणघडीचा बोलका साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणजे लोकराज्य. विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती यामुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळेच लोकराज्य हे मराठी मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून ऑडिट ब्युरो ऑफ सक्युर्लेशन (अेबीसी)ने अधिकृत मोहोर उमटवली आहे.

मराठी लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती असलेले नियतकालिक मार्च 1955 पासून प्रकाशित होत आहे. (सुरुवातीला काही काळ लोकराज्य (इंग्रजी) या नावाने आणि नंतर ‘महाराष्ट्र अहेड’ या नावाने). राज्यात उर्दू भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचवण्याचे काम उर्दू भाषेतील लोकराज्य जानेवारी 1974 पासून यशस्वीपणे करत आहे. राज्यात हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती राज्यातील हिंदी भाषकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने 1976 पासून हिंदी भाषेतून लोकराज्य प्रसिद्ध केले जात आहे. राज्यात मुंबई व इतर काही ठिकाणी गुजराती भाषकांची मोठी संख्या पाहता गुजराती भाषेतूनही लोकराज्य प्रकाशित करण्यात येत आहे.

लोकराज्य मराठी |

चला जाणूया नदीला…

 

लोकराज्य मराठी |

एकच ध्येय महाराष्ट्राची प्रगती!

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 या महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

लोकराज्य मराठी |

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

     माहिती व जनसंपर्क  महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाच्या ऑगस्ट-2022 या महिन्याच्या अंकाचे  प्रकाशन करण्यात आले.

लोकराज्य मराठी |

लोकराज्य जुलै 2022

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' जुलै-2022 च्या अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी समारंभ, कृषी विभागाच्या विवि

लोकराज्य मराठी |

लोकराज्य - जून-2022

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेला 'लोकराज्य'चा जून-2022 चा अंक ‘समता, न्याय, एकात्मतेच्या मार्गावर...माझा महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारीत सामाजिक न्याय विशेषांक म्हण

लोकराज्य मराठी |

लोकराज्य मे २०२२

 

'लोकराज्य' मे-2022 महिन्याच्या अंकात पर्यटन विशेष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त कृतज्ञता पर्व विशेष विभाग समाविष्ट आहे.